टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 61 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 960 झाली आहे.
आज 61 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर माढा तालुक्यातील मोडलिंब येथील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona virus update )
मंगळवारी ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 389 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 61 पॉझिटिव्ह आहेत तर 328 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 960 झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 39 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 415 जण घरी परतले आहेत. 506 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज माळीनगर , ता.माळशिरस . किनी , ता . अक्कलकोट , अंकलगी , ता . अक्कलकोट सिध्दार्थ नगर , मोहोळ . कोरवली , ता . मोहोळ , टाकळी सिकंदर , ता . मोहोळ . देगाव , ता . मोहोळ , संत पेठ , पंढरपूर . रोपळे , ता.पंढरपूर . कान्हापुरी , ता.पंढरपूर . मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर , औराद , ता.दक्षिण सोलापूर बक्षीहिप्परगा , ता.दक्षिण सोलापूर . कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर , मुळेगाव तांडा , ता.दक्षिण सोलापूर नवीन विडीघरकुल , ता.दक्षिण सोलापूर भंडारकवठा , ता.दक्षिण सोलापूर , अकोले ( दगड ) , ता.माढा . कसबा पेठ , बार्शी . म्हाडा कॉलनी , बार्शी नागणे प्लॉट , बार्शी . बारंगुळे प्लॉट , बार्शी . घाणेगाव , ता.बार्शी . गुळपोळी , ता.बार्शी . पानगाव , ता.बार्शी पिंपरी ( साकत ) , ता.बार्शी . सासुरे , ता.बार्शी . वैराग , ता.बार्शी . बाभुळगाव , ता.बार्शी असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 160 , बार्शी 213 , करमाळा 13 , माढा 27, माळशिरस 15 , मंगळवेढा 5 , मोहोळ 54, उत्तर सोलापूर 102 , पंढरपूर 57 , सांगोला 6, दक्षिण सोलापूर 308. असे एकूण 960 रुग्ण
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज