टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले तरी दुसर्या बाजूला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. रविवार आणखी 260 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.एकूण बाधितांची संख्या 1 हजार 823 वर गेली आहे.तर मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथील 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
रविवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2304 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 2044 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 260 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 87 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
रविवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अक्कलकोट (पु.33.स्त्री.11) 44, बार्शी (पु.27.स्त्री.25) 52, करमाळा (पु.4) 4,माढा (पु.7.स्त्री.3) 10 ,माळशिरस (पु.26.स्त्री.18) 44,मंगळवेढा (पु.3.स्त्री.2) 5,मोहोळ (पु.26.स्त्री.14) 40,उत्तर सोलापूर (पु.6.स्त्री.6) 12 , पंढरपूर (पु.18.स्त्री.12) 30, सांगोला (2 स्त्री) 2 ,दक्षिण सोलापूर (पु.9.स्त्री.8) 17 असे एकूण 260 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आतापर्यंत ग्रामीण भागातील 13 हजार 131 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 13 हजार 019 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 11 हजार 197 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 823 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 112 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, तर मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. अद्यापही 1178 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 601 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज