समाधान फुगारे । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पहिल्यांदाच एका दिवसांत 66 रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसांत तब्बल 66 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 66 रूग्णांची भर झाली असून एकूण रुग्ण संख्या 673 तर आजपर्यंत मृतांची संख्या 30 झाली आहे.यात 23 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 236 अहवाल प्राप्त झाले. यात 170 निगेटिव्ह तर 66 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 41 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे.आज 41 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
आज नव्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगावात दोन, कोंडीत एक, मार्डीत पाच, तिऱ्हे येथे पाच, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नवीन विडी घरकूल येथे आठ, कुंभारी येथे दोन, लिंबिचिंचोळी येथे चार, मुळेगाव येथे दोन, मुळेगाव तांडा येथे तीन, उळेगाव येथे एक, कासेगाव येथे एक, हत्तूर येथे सहा, वांगीत पाच, मंद्रूपमध्ये दोन, बसवनगर येथे एक, वडापुरात एक, नांदणी येथे एक, होटगीत दोन, मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे एक, माढा तालुक्यातील भोसरेत दोन, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपुरात एक,
मंगळवेढ्यातील बोराळे येथे एक, अक्कलकोटमधील बुधवारपेठेत एक, दुधनी येथे दोन, बोरगाव दे येथे एक, करजगी येथे एक, बार्शीतील कसबापेठेत एक, वैराग येथे दोन, घाणेगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आजच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. अद्यापही 52 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 311 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर 332 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या
अक्कलकोट-123, बार्शी-117, करमाळा-6, माढा-18, माळशिरस-6, मंगळवेढा-2, मोहोळ-34, उत्तर सोलापूर-76, पंढरपूर-34, सांगोला-5, दक्षिण सोलापूर-252, एकूण-673
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज