
सोलापूर । मं.टा. प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 255 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.सलग दुसऱ्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.एकूण कोरोनाबाधित संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे.
आज 2 हजार 897 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 317 एवढी झाली आहे.
अद्यापही रुग्णालयात 2 हजार 902 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या सात हजार 652 एवढी झाली आहे.
आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोना बाधित रुग्ण
सांगोला तालुक्यातील अचकदाणी, कोळा, महूद रोड, परीट गल्ली, तिप्पेहळी, यलमार मंगेवाडी, करमाळ्यातील मंगळवार पेठ, माळशिरस तालुक्यातील अकलूज, बोंडले, बोरगाव, चांदापुरी, दहिगाव, दसूर, गारवाड, गिरवी, गोरडवाडी, गुरसाळे, जाधववाडी, जांभूळ, जानकर प्लॉट, कमल मळा, खुडूस, माळीनगर, मारकडवाडी, मोरोची, नातेपुते, पानीव, पठाण वस्ती, पिंपरी, पुरंदावडे, संग्राम नगर, शंकर नगर, श्रीपूर, सिद्धार्थ नगर, तामशिदवाडी, तरंगफळ, वेळापूर, यशवंनगर, झिंजेवाडी, मेडद,
तर अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी, सतलापूर, मैंदर्गी, शिवाजीनगर तांडा, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे गल्ली, बावी, बोरगाव, चुंब, दाणे गल्ली, दत्तनगर, देवगाव, गाडेगाव रोड, गौडगाव, जावळी प्लॉट, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, मिरगणे अपार्टमेंट, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, पानगाव, पिंपळकर प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सोमवार पेठ, तुळशीराम रोड, उपळे दुमाला,
तर माढ्यातील अकुलगाव, अरणगाव, भोसरे, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, वडाचीवाडी, वडशिंगे, मोहोळमधील अनगर, एकुरके, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर, पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबे, भंडीशेगाव, भोसले चौक, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, दाळे गल्ली, धोंडेवाडी, गोकुळनगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भोसे, किश्ते गल्ली, कोर्टी, लिंक रोड, नाथ चौक, ओमकार नगर, पुळूज, संत पेठ, स्टेशन रोड, सुस्ते, उत्पात गल्ली, वाखरी,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, बोरामणी, इंगळगी, माळकवठा, एनटीपीसी, विडी घरकुल या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज ‘या’ भागातील नऊ बळी
माळशिरस तालुक्यातील मेडद येथील 70 वर्षाचे पुरुष, महर्षी कॉलनी अकलूज येथील 73 वर्षाची महिला, चौंडेश्वरीवाडी येथील 85 वर्षाचे पुरुष, अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याजवळील 60 वर्षाचे पुरुष, ढेमरेवाडी (ता. बार्शी) येथील येथील 90 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता.माढा) येथील 56 वर्षाची महिला, करमाळ्यातील भवानी पेठेतील 50 वर्षाचे पुरुष, सावडी येथील 72 वर्षाचे पुरुष, किल्ला बाग येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
In the rural areas of Solapur today, 255 new corona-affected nine people were killed
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”





बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













