मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये 601 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागामध्ये आज 3 हजार 998 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 397 जणांचे अहवाल हे निगेटिव आले तर 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्याचबरोबर कोरोनामुळे आज 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 494 इतकी झाली आहे तर आत्तापर्यंत बाधितांची संख्या 17 हजार 339 एवढी झाली आहे.
आज ‘या’ गावातील 13 जणांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील तामशेवाडी येथील 74 वर्षे पुरुष, इर्लेवाडी (ता. बार्शी) येथील 65 वर्षाची महिला, होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 74 वर्षाचे पुरुष, नाझरे (ता. सांगोला) येथील 50 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 42 वर्षांचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षाचे पुरुष, जेऊर (ता. करमाळा) येथील 75 वर्षांचे पुरुष,
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील 50 वर्षाचे पुरुष, भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील 62 वर्षाचे पुरुष, फुले प्लॉट बार्शी येथील 70 वर्षाचे पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाची महिला, तांदुळवाडी (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष तर अनिल नगर पंढरपूर येथील 62 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Solapur rural 601 new positive patients coronated 13 people died
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज