समाधान फुगारे । सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ( Solapur rural corona news update )
आज आलेल्या अहवालानुसार 241 जण नव्याने कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 6 हजार 772 एवढी झाली आहे. आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार एकूण 3 हजार 13 जणांची तपासणी केली. त्यापैकी 2 हजार 772 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 241 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
‘या’ भागातील लोकांना कोरोनाची लागण
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, आरळी, डोरले गल्ली, कोंडुभैरी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मानेगल्ली, पाटखळ, रत्नपारखी ज्वेलर्स, तळसंगी, सांगोला रोड, संतपेठ, संत रोहिदास चौक, शिवाजी चौक, सुस्ते, टाकळी रोड, तिसंगी, तुंगत, उजनी कॉलनी, उमदे गल्ली, वाखरी, विजापूर गल्ली, व्यासनारायण झोपडपट्टी, झेंडे गल्ली येथील बाधित यांचा समावेश आहे.
पंढरपुरातील आंबेडकरनगर, आढीव, अनिलनगर, बडवेचर झोपडपट्टी, पोलिस लाइन मागे, भोसले चौक, भोसे, चळे, देगाव, डोंबे गल्ली, गाताडे प्लॉट, घनशाम सोसायटी, गोपाळपूर रोड, कव्हरमेंट कॉलनी, गुरसाळे, इंदिरा गांधी मार्केट, इसबावी, जैनवाडी, जळोली, जुना कराड नाका, जुना सोलापूर नाका, कडबे गल्ली, काळा मारुती मंदिर, कालिका देवी चौक, करकंब, करोळे, किस्ते गल्ली, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महात्मा फुले चौक, महावीर नगर, माळी गल्ली, नागपूरकर मठ, नवी पेठ, बसस्टॅंड, नेमतवाडी, पोस्ट ऑफिस क्वार्टर्स, रामबाग रोड, रामकृष्ण परमहंस सोसायटी, रांझणी येथील बाधित यांचा समावेश आहे.
करमाळा तालुक्यातील भगतवाडी, खडकपुरा, मार्केट यार्ड, साठेनगर, वीट, बार्शीतील ऐनापूर रोड, अण्णाभाऊ साठे नगर, बाळेश्वर नाका, बारंगुळे प्लॉट, भीमनगर, दडशिंगे, दत्तनगर, धर्माधिकारी प्लॉट, धारुळकर रोड, ढेमरेवाडी, गादेगाव रोड, जैनमंदिर दत्तबोल, जयशंकर मील, कसबा पेठ, खुरपे बोळ, कुर्डुवाडी रोड, लोकमान्य चाळ, श्रीपत पिंपरी, तुरट गल्ली, सोलापूर रोड, सुभाषनगर, ताड सौंदणे, उंबरगे, वैराग, मोहोळ तालुक्यातील अनगर, डिकसळ, गुलमोहर पार्क, कामती बु, कुरुल, सिद्धार्थनगर, पाचीपट्टा येथील बाधित यांचा समावेश आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण, कवठे, कोंडी तांडा, नान्नज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट होटगी, फताटेवाडी, मुस्ती, अक्कलकोट तालुक्यातील किणी, दर्शनाळ, मैंदर्गी, सांगोला तालुक्यातील चिकमहूद, कडलास, कोळा, नाझरे, राजुरी, माढा तालुक्यातील भोसरे, मानेगाव, मिरगणे, मोडनिंब, पालवन, पिंपळनेर, माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी, चाकोरे, गणेशगाव, मेडद, विझोरी, वाघोली, यशवंतनगर या भागातील नागरिकांना आज नव्याने कोरोनाची लागण झाली आहे.
‘या’ भागातील पाच जणांचा बळी
आज पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील 58 वर्षीय पुरुष तर सुतारगल्ली करमाळा येथील 70 वर्षीय पुरुष,अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 65 वर्षीय पुरुष, डिकसळ (ता.मोहोळ) येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज