टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी एका पोलीसास अटक केली आहे तर दुसरा पोलीस ठाण्यातून पळून गेला. ही घटना घडली गुरुवार दि .20 ऑगस्ट रोजी घडली आहे.
पोलीस हवालदार जयप्रकाश चंद्रशा कांबळे असे अटक झालेल्या पोलिसांचे नाव आहे, तर पोलीस नाईक किर्तीराज शाहूराज अडगळे असे पळून गेलेल्या आरोपी पोलिसांचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की , सोरेगाव परिसरात म्हंतपा कलशेट्टी यांची शेत जमीन आहे.त्यांच्या शेजारी रामरेड्डी यांची शेत जमीन आहे या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण झाल्याचे पाहून 5 ते 6 जण शेतात जाऊन अतिक्रमण काढत होते त्यावेळी म्हंतप्पा कलशेट्टी यांची भिंत पडली आणि कामगाराकडील मोबाईल काढून घेतल्याने राम रेड्डीसह 10 ते 12 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला.
त्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्याकडे असून ते तपास करताना त्या घटनेच्या वेळी पोलीस हवालदार कांबळे आणि अडगळे या दोघांचे मोबाईल वर आरोपीचे फोन आल्याचे उघड झाले. त्यावरून दरोड्याच्या गुन्ह्यात या दोघा पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले.
त्यावरून दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये हवालदार कंबलेला अटक करण्यात आली तर पोलीस नाईक किर्तीराज अडगळे याला अटक करताना लघवी लागल्याचा बहाणा करून त्याने पोलीस ठाण्यातून पळ काढला.
म्हणून त्याच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बेंबडे करीत आहेत.
Solapur police arrested for robbery A policeman fled
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज