मंगळवेढा टाईम्स टीम । पंढरपूर शहरातील मठाच्या खोलीमध्ये एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.तानाजी ज्ञानोबा कोंडे असे मयत वृद्धाचे नाव असून , त्याने गळफास घेतल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. One commits suicide in a monastery in Pandharpur
याबाबत सविस्तर वृत्त असे की , पंढरपूर शहरातील इसबावी येथे असणाऱ्या बाळकृष्ण फणसे मठामध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या मठाच्या एका खोलीमध्ये तानाजी ज्ञानोबा कोंडे ( वय ६० ) रा . केळवडे तालुका भोर , जिल्हा पुणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला . ही घटना समजताच , कोंडीभाऊ महादेव जाधव यांनी या घटनेची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली . माहिती मिळताच , पोलीस घटनास्थळी रवाना झाले.
मयताचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान या वृद्ध व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून , याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या घटनेबाबत पुढील तपास हेडकॉन्स्टेबल वाघमोडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज