मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अल्पवयीन विद्यार्थिनीवर गँगरेप करणार्या नराधमांना पोलिसच पाठीशी घालत असल्याने तपासावर संशय व्यक्त होऊ लागल्याने पीडितेच्या न्यायासाठी शुक्रवार, 21 फेबु्रवारी रोजी सकाळी 11.30 वाजता साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून सर्वसमावेशक निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खंदारे यांनी सांगितले की, अल्पवयीन विद्यार्थिनीवर 8 महिने अत्याचार केल्याचा गुन्हा योग्य त्या कलमान्वये पोलिसांत 11 फेबु्रवारी 2020 रोजी दाखल झाला आहे. फिर्याद दाखल करताना पीडित मुलीने 11 पेक्षा अधिक म्हणजेच 16 नराधमांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले असल्याची खात्रीलायक माहिती समजते.
यासह त्यांचा अनुषंगिक तपासही होत नाही. या प्रकरणावरून आरोपींचे सेक्स स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता असल्याने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी व्हावी. या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी तपास ‘सीबीआय’कडे वर्ग करावा. पीडितेला योग्य न्याय मिळण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि अॅड. असीम सरोदे अथवा अॅड. उज्वल निकम आदी निष्णांत वकिलांची नियुक्ती करून नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे. यावेळी युवराज पवार, बाळासाहेब वाघमारे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड, विजय पोटफाडे, हिरा अडगळ, महादेव भोसले आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज