टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनपा सभागृह नेते असलेल्या किसन जाधव यांच्यावर खासगी सावकारकी आणि बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलगर वस्ती जवळील अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ खाजगी सावकारीतून एका तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्रवीण जाधव याने 6 महिन्यांपूर्वी आईच्या कपडे व्यवसायासाठी खासगी नगरसेवक किसन जाधव याच्याकडून 50 हजार रुपये प्रति महिना 10 टक्के व्याजाने घेतले होते. परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे साडी विक्रीचा व्यवसाय झाला नाही.
त्यानंतर प्रवीण जाधव याला किसन जाधव याचे पैसे देता आले नाहीत. 16 ऑगस्ट रोजी प्रवीण जाधव हा त्याच्या मावशीला उत्कर्ष हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याने मावशीला पाहण्यासाठी गेला होता.
त्यावेळी किसन जाधव याच्या पत्नीलासुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यामुळे किसन जाधवसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी किसन जाधव याने प्रवीण जाधव याला 50 हजार व त्याचे व्याज असे 2 लाख रुपये कधी देणार, असे विचारले. तेव्हा प्रवीण याने किसन जाधव याला सध्या साडी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने माझ्याकडे पैसे नाहीत, मी थोड्या दिवसात पैसे अॅडजेस्ट करून देतो,
असे सांगितले. तेव्हा किसन जाधव याने मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे का? तुला मी दाखवितो, असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रवीण जाधव व त्याचा मित्र असे दोघे गप्पा मारत अण्णासाहेब पाटील शाळेजवळील राठोड किराणा दुकानाशेजारी रिक्षात बसले होते.
तेव्हा किसन जाधव याचे 6 महिन्यांपूर्वी व्याजाने घेतलेले पैसे परत न दिल्याने किसन जाधव याच्या सांगण्यावरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगूू गायकवाड यांनी प्रवीण जाधव याला लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, बेसबॉल बॅटने मारून खुनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या फिर्यादीवरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, किसन जाधव, शुभम मरगू जाधव (सर्व रा. सोलापूर) अशा 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भुसनूर हे करत आहेत.
A case has been registered against five persons, including Solapur NCP corporator Kisan Jadhav
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज