mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात जुगार खेळणाऱ्या 17 जणांसह 21 जण पॉझिटिव्ह; रुग्णांची प्रशासनासोबत हुज्जत


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील पश्चिम टोकावर असलेल्या लक्ष्मीदहिवडी गावांमध्ये एकत्रित बसून जुगार खेळणाऱ्या १७ जणांना कोरोणाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबासह २१ जणांचे रिपोर्ट पिझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


गावात एकूण रुग्ण २६ झाले आहेत अशा परिस्थितीमध्ये शाळेत विलगीकरण केलेल्या त्या जुगाऱ्यानी मंगळवेढ्याच्या कोव्हिड सेंटर मध्ये जाण्यास नकार देत प्रशासनाशी हुज्जत घालून आमच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट करायचा नाहीत असा हट्ट धरत ‘हाय रिस्क,लो रिस्क’संपर्कातील लोकांची नावे देण्यास नकार दिला, आमचेच रिपोर्ट प्रशासनाने खोटे दिले असल्याचा आरोप प्रशासनावर केला.

काल गुरुवारी दिवसभर ग्रामस्तरीय समितीसोबत त्या रुग्णांनी हुज्जत घालत आरोग्य विभागाला दिवसभर गावात ताटकळत ठेवले त्यामुळे सकाळपासून ग्रामस्थरीय समितीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावणे केले होते मात्र कोणीही पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष्मीदहिवडीला फिरकला नसल्याने त्या जुगाऱ्याना पोलीस प्रशासन पाठीशी घालत होते की काय? हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत होते.


सुमारे साडेआठ हजार लोकसंख्या असलेले हे गाव असून यामध्ये जुगार,दारू विक्री असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात या अवैध धंद्यावर पोलिसांनी निर्बंध आणले नाहीत गावात अनेक ठिकाणी पत्याचे क्लब सुरू असून शेजारील महमदाबाद येथील काही नागरिक ही या ठिकाणी पत्ते खेळण्यास येत असून त्या गावातीलही एकजण पॉझिटिव्ह आला आहे.

या पत्ते खेळणाऱ्या ग्रुपमधील एकाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ग्रामस्तरीय समितीने सर्वांचे गावातील शाळेत विलगीकरण करण्यात आले होते.त्यामुळे त्यांचीही घेऊन टेस्ट करण्यात आले असता त्या सर्वांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोणाची लागण होऊ शकते यासाठी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यासाठी गावात येऊन स्वब घेण्याचे नियोजन केले मात्र त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला.


त्यामुळे लक्ष्मी दहिवडी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित रुग्णांच्या कुटुंबांच्या कोरणा टेस्ट घेण्यास आरोग्य प्रशासनही हतबल झाले असून पोलिसांनी काहीच सहकार्याची भूमिका घेतली नसल्याने पोलिस प्रशासनावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.

या अगोदर गावात सहा रुग्ण सापडले असल्यामुळे गाव कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले होते अशा परिस्थिती रेशन दुकानदारांनीही दुकान उघडत गावात धान्य वाटप केले असून त्यामध्ये एक दुकानदारही पॉझिटिव आला आहे त्या दुकानदाराने सुमारे दीडशे लोकांना रेशनचे धान्य वाटप केल्याची चर्चा असून गावात टेस्ट साठी स्वबच घेऊ दिले नसल्याने व पोलिसांनी सहकार्य न केल्याने हे पॉझिटिव्ह रुग्ण किती कुटुंबांचे बळी घेणार हे येणार काळच ठरविणार आहे.

Solapur mangalwedha Lakshmidahivadi 21 positive including 17 gamblers

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनाच्या कॉलरट्यूनने नागरिक त्रस्त! कॉलरट्यून त्वरित बंद करण्याची मागणी

कोरोनाच्या कॉलरट्यूनने नागरिक त्रस्त! कॉलरट्यून त्वरित बंद करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा