टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोना कमी होईना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून आज 10 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 230 वर गेली आहे.
आज मंगळवार दि.11 ऑगस्ट रोजी 58 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 200 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर नागरीक हे आधंळगांव -1 , मंगळवेढा शहर -7 येथील आहेत.सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 2 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्ण अरळी -1 , मंगळवेढा -1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 230
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 109 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज