टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना झाली आहे आज आणखी 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या 415 वर गेली आहे.
आज दि.22 ऑगस्ट रोजी 12 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.
तसेच आज 17 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.17 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह -2 आणि निगेटिव्ह -15 आलेले आहेत. सदर नागरिक हे दामाजीनगर 2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 10 नागरीकांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
सदर नागरिक हे मंगळवेढा शहर -2 , चोखामेळानगर -2 , सलगर बु . – 3 , मारापुर -1 , देगांव -2 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 415 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 220 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 191 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज