मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या – आज 11 ने वाढून 275 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सोमवारी सायंकाळी दिली. पुन्हा आज बाधितांची संख्या 11 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. दरम्यान , रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे ही मोठी दिलासादायक बाब दिसून येते आहे.
काल रविवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 264 इतकी झाली होती . अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती . त्यात 152 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता . या आलेल्या वैद्यकीय अहवालामुळे संपूर्ण सोलापूर शहरात मोठी खळबळ माजली होती . ज्या वेगात ग्रीन झोन वरून सोलापूर रेड झोन मध्ये दाखल झाले. त्यावेगाने पुन्हा सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केलं आहे.
आज तब्बल 11 नवे रुग्ण वाढले
दि. 11/05/2020
एकूण रुग्णांचा आकडा 275 तर मृत 17
एकूण रुग्ण 275
मृतांची संख्या 17
डिस्चार्ज 41
उपचार सुरू असलेले रुग्ण 217
आज आलेले एकूण अहवाल 126
आज आलेल्या अहवालात
एकता नगर, किसान संकुल, जवाहर नगर, पाच्चा पेठ, महालक्ष्मी नगर, सदर बाजार, मिलींद नगर, बुधवार पेठ, कुंमठा नाका, हुडको, रंगभवन परिसरातून प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे
आज तीन मृत रुग्णां मध्ये जवाहर नगर येतील 50 वर्षीय पुरुष, सदर बझार परिसरातील 46 वर्षीय महिला , पाच्छा पेठ परीसरातील 68 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज