मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 48 ने वाढून झाली 264 आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रविवारी सायंकाळी दिली. पुन्हा आज एकाच दिवशी बाधितांची संख्या 48 ने वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क लावणे अत्यावश्यक आहे. काल शनिवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 216 इतकी झाली होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. त्यात 123 पुरुष तर 93 महिलांचा समावेश होता.
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज