मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होत असतानाही दुसरीकडे मात्र, मृतांची संख्या कमी झालेली नाही. मंगळवारी (ता. 7) शहरात 38 जणांची कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दुसरीकडे पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला असून त्यामध्ये जोडभावी पेठेतील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता मृतांची संख्या 282 झाली असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 852 झाली आहे. सोलापूर शहराचा मृत्यूदर बाधित रुग्णांच्या तुलनेत राज्यात अव्वलच आहे.
मंगळवारी सम्राट चौक, जम्मा वस्ती, जग्गम वस्ती (अक्कलकोट रोड), विजयपूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी, विद्यानगर (शेळगी), गुरुवार पेठ, महेश थोबडे नगर, हैदराबाद रोडवरील कमल नगर, शिक्षक सोसायटी, अक्कलकोट रोड एमआयडीसी, साखर पेठ, विडी घरकूल, दक्षिण कसबा, संगम नगर (मुळेगाव रोड), राजीव गांधी नगर (भवानी पेठ), सिध्देश्वर नगर (नई जिदंगी), एसआरपीएफ क्वार्टर, हब्बू वस्ती, अशोक चौकातील सत्यम हॉटेलजवळ प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तसेच म्हेत्रे वस्ती (प्रतापनगर) येथे तीन, स्वामी विवेकानंद नगरात दोन, कुमठे येथे तीन, रामदेव नगर (शेळगी) येथे तीन, शाहीर वस्ती (भवानी पेठ), हराळे नगर (मजेरवाडी), कल्याण नगर (होटगी रोड) आणि वसंत नगर याठिकाणी प्रत्येकी दोन रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
‘या’ परिसरातील पाच जणांचा झाला मृत्यू
जुळे सोलापुरातील गोकूळ नगरातील 78 वर्षीय पुरुष, महेश थोबडे नगरातील 84 वर्षीय पुरुष, दाते गणपतीजवळील राजवाडा संकूल येथील 69 वर्षीय पुरुष, जोडभावी पेठेतील 30 वर्षीय महिला व पद्मानगरातील 65 वर्षीय महिलेचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Solapur found 38 positives in the city on Tuesday; Five killed
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज