टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर मध्ये गोलमेज परिषदेची बैठक झाली यावेळी आरक्षणासाठी 10 अक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. Maratha Community Announcement Maharashtra Bandh For Reservation
मात्र 21 सप्टेंबर च्या सोलापूर शहर जिल्हा बंद ला येथील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या बंद नंतर तात्काळ राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन,
मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले असल्याने सोलापूर शहर जिल्ह्याचा 10 अक्टोबर रोजीच्या बंद मध्ये सहभाग नसल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सांगितलं आहे.
तसेच मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्याची पुढील आंदोलनाची रूपरेषा लवकरच जाहीर करू असं देखील पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
Solapur does not participate in the Maharashtra Bandh of the Maratha community
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज