टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील कोरोना हद्दपार करण्यासाठी महापालिका प्रशासन शर्थिचे प्रयत्न करु लागले आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी दवाखान्यांची दारे बंद केल्यानंतर महापालिकेच्या इशाऱ्यानंतर हे दवाखाने सुरु झाले. रुग्णांना सेवा देण्यासाठी जे डॉक्टर व नर्स कामावर रुजू होत नाहीत त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल करुनही सेवेत न येणाऱ्या 11 डॉक्टर आणि 15 नर्सची नोंदणीच रद्द करावी असा प्रस्ताव महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातील कुचराई डॉक्टर आणि नर्सला महागात पडण्याची शक्यता आहे.
प्रस्ताव पाठविण्यात येणाऱ्या 15 नर्समध्ये सोलापुरातील एका नामांकित रुग्णालयातील तब्बल 12 नर्सचा समावेश आहे. तीन नर्स या सोलापुरातीलच एका खासगी रुग्णालयातील आहेत. 11 डॉक्टरांमध्ये सोलापुरातील नामांकित रुग्णालयातील तब्बल 10 डॉक्टरांचा समावेश आहे.
एक डॉक्टर हे सोलापुरातीलच एका खासगी रुग्णालयातील आहेत. डॉक्टरांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हा प्रस्ताव महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठविण्यात येणार आहे. नर्सला दिलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलला पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम 2005 व सुधारित 2011 (मेस्मा) अंतर्गत ही नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त पी. शिवशंकर यांनी केला आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांमध्ये 11 वैद्यकीय अधिकारी व 15 नर्स त्यांच्या संबंधित रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू होत नसल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. हे डॉक्टर व नर्स ज्या रुग्णालयात काम करत होते ती दोन्ही रुग्णालये महापालिका आयुक्तांनी 6 जून रोजी काढलेल्या आदेशानूसार अधिग्रहित करण्यात आलेली आहेत.
In Solapur, doctors and nurses were proposed for action under MESMA. 11 doctors and 16 nurses were included
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज