मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर ग्रामीण भागातील सर्व दुकाने आज शुक्रवारपासून सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली ठेवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. मद्य विक्रीच्या दुकानांना यात परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीच सूट देण्यात आलेली नाही.
विभागीय आयुक्तांनी लॉकडाउनच्या काळात बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने उदा.हार्डवेअर,कपडे, भांड्याची दुकाने इ.वर्गवारीतील साहित्य नागरिकांना रोज उपलब्ध व्हावे यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने खुली करण्यास परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी काही बंधने घातली आहेत.
लेन अथवा गल्लीची लांबी एक किमी असल्यास प्रति किमी पाच दुकाने खुली असावीत.बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी वेगळा नियम आहे. एका किमी अंतरात १० दुकाने असल्यास ती दुकाने सम आणि विषम तारखेला उघडी ठेवण्यात येतील.
१५ दुकाने असल्यास दुकान क्र.१,४,७,१० अशा क्रमांकाने दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.नगरपालिका,ग्रामपंचायत यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
———————————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज