टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघाचा अध्यक्ष निवडण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी आज दुपारी 1 वाजता दूध संघाच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविली होती.
आजच्या बैठकीला सर्वच संचालक गैरहजर राहिल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली. त्यामुळे दूध संघाच्या अध्यक्षांची निवड आता काही दिवस लांबणीवर पडणार आहे.
अध्यासी अधिकारी शिरापूरकर आज 1 वाजण्यापूर्वी दूध संघाच्या प्रधान कार्यालयात आले. दिड वाजेपर्यंत बैठकीसाठी संचालकांची वाट पाहण्यात आली. बैठकीला कोणीच संचालक आले नसल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.
त्याबाबतचे इतिवृत्त तयार करुन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अध्यासी अधिकारी शिरापूरकर यांनी दिली. अध्यक्ष निवडीसाठी काढण्यात येणाऱ्या बैठकीची नोटीस सात दिवस आगोदर देणे आवश्यक आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत बैठक निघणे शक्य नसल्याने 2 किंवा 3 सप्टेंबर रोजी बैठक काढली जाईल अशी शक्यता अध्यासी अधिकारी शिरापूरकर यांनी व्यक्त केली.
Solapur District Milk Association President Election Meeting in September
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज