mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 25, 2023
in मंगळवेढा, राज्य
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यामध्ये कोळी, महादेव कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार व पारधी या अनुसूचित जमातीमधील नागरिक वास्तव्यास आहेत.

त्यामुळे या समाजाला शासन दरबारी असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत असणाऱ्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात व्यक्त केले आहे.

त्यामध्ये सन २०११ या वर्षाच्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात तब्बल ५१९१९ महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. जिल्ह्यातील कोळी समाजाला सामाजिक दृष्ट्या विकासाच्या मुख्य पथावर आणण्यासाठी शासनामार्फत त्यांना विविध योजना निर्माण करण्यात आल्या आहेत.

पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजाला जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

परंतु ही जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  आणि जात प्रमाणपत्र मिळाले तरी त्याची पडताळणी समिती पुणे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे या समाजातील लोकांना शबरी घरकुल योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळत नाहीत , तसेच आदिवासीच्या कोणत्याही योजनेचा लाभ या जमातीला मिळत नाही. तसेच समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या व पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला देखील कोणतेच लाभ मिळत नाही आहे.

कोळी समाजाची लोकसंख्या गृहीत धरून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सन १९७६ पासून आदिवासी विकास व राजकीय आरक्षण घेतले जाते. सोलापूर जिल्ह्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्वतंत्र आहे.

मात्र सवलती द्यायच्या वेळेला मात्र या लोकांना प्रशासन बोगस ठरवत आहे . या लोकसंख्येच्या आधारावरती आदिवासी विकास निधी घेतला गेला आहे.

राजकीय आरक्षण आणि आदिवासी विकास निधी घ्यायच्या वेळेला मात्र ही लोकसंख्या गृहीत धरता त्यावेळेला ही लोकसंख्या खरी असते परंतु लाभ द्यायच्या वेळेला मात्र त्यांना डावलली जात असल्याची भावना या समाजातील लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

त्यामुळे राज्यातील महादेव कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार जमातीला जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या, विना अट मिळण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत शासन आदेश निर्गमित करण्यात यावे अशी मागणी आ आवताडे यांनी केली आहे.

त्याचबरोबर आतापर्यंत या जमातीला आदिवासी गृहीत धरून या लोकसंख्येच्या आधारे  घेतलेला आदिवासी विकास निधी त्या लाभार्थ्याना मिळालेला नसेल तर तो निधी कुठे गेला याची चौकशी करून त्याचा अहवाल शासन दरबारी सादर करावा अशी मागणीही आमदार आवताडे यांनी केली आहे.

किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी समाजावर व पारंपारिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजावर अभ्यास करण्याकरता तज्ञांची समिती नेमणूक त्यांना देखील आरक्षण कसे देता येईल याकरता शासन सकारात्मक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी असेही आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात सांगितले आहे.

मंगळवेढा भुईकोट किल्ला नूतनीकरण करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे आणि शौर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन करून महाराष्ट्राचा जाज्वल्य गौरवशाली इतिहास जतन करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे उभा केलेल्या गड किल्ल्यांच्या यादीमध्ये मंगळवेढा संतनगरीतील भुईकोट किल्ला समाविष्ट होतो.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवरायांच्या मुक्कामाचे विविध पैलू या किल्ल्यामध्ये आजही इतिहास संशोधक व शिवप्रेमींना दिसून येतात. त्यामुळे या किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी व गतवैभवासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हावेत अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत आरोग्य शिबीर

May 30, 2023
ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय, जल जीवन मिशन योजना रखडली; ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचाचा आंदोलनाचा इशारा

May 30, 2023
खळबळ! मंगळवेढा शहरातून पती बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलिसात तक्रार

माहेरहून सासरी जाते असे सांगून बाहेर पडली; मंगळवेढ्यातून विवाहित महिला मुलीसह बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल

May 30, 2023
लाचखोर तलाठी सुरज नळे आद्यप फरार, शोधासाठी पथके रवाना, चव्हाणाला चार दिवसाची पोलिस कोठडी; लाचेत कोण-कोण हिस्सेदार? मालमत्तेची चौकशी होणार?

लाचखोर सुरज नळे प्रकरणाचे 200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल; लाच प्रकरणात जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारा आरोपी म्हणून नळे याची नोंद

May 30, 2023
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर छापा टाकून 2 लाख 4 हजाराचा मुद्देमाल केला जप्त; एका शिक्षकासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

May 30, 2023
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

Breaking! गूढ आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला, नागरिक भयभीत

May 29, 2023
Next Post
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2023
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

May 31, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
शेतकऱ्यांनो! सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार; अभिजीत पाटील यांची ग्वाही

सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो; सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद

May 30, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत आरोग्य शिबीर

May 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा