टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यास सुरुवात केली आहे . त्यातील एक भाग म्हणजे खाजगी रुग्णालये तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आल्याचा आदेश लागू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना ने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक आहे .या परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालय व दवाखाने बंद असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे कोरोना आजारांचे रुग्ण वगळून इतर आजारी रुग्णांना उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत होत्या. आणि त्याचा भार शासकीय रुग्णालयांवर वाढत होता.
अनेक वेळा असे दिसून आले होते की अपघात ,प्रसूती ,मधुमेह ,किडनीचा आजार,हृदयविकार, मणक्यांचे ,हाडांचे आजार,पॅरालिसीस इत्यादी रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न करता इतरत्र जाण्यास सांगण्यात आले होते. शहरात स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र रुग्णालय बंद असल्याने आरोग्यसेवा देण्यात अडथळा होत होता.त्यामुळे शहरातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक, औषधे दुकाने आणि संबंधित आरोग्यविषयक खाजगी आस्थापना सुरू आहेत का नाहीत , त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी किंवा ज्या रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे. त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय सुविधा देत आहेत का नाहीत याची सविस्तर तपासणी करणे आवश्यक होते.
यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच जणांचे पथक नियुक्त केला असल्याचा आदेश दिला आहे.
हे आहे पथक…
उज्वला सोरटे अप्पर तहसीलदार मंद्रूप या पथक प्रमुख असणार आहेत. तर डॉ. ज्ञानेश्वर सोडल, वैद्यकीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका, श्री परदेशी मठ नायब तहसीलदार, मंगळवेढा ,श्रीराम कुलकर्णी परवाना अधीक्षक सोलापूर महानगरपालिका व तुकाराम घाडगे सपोनि आर्थिक गुन्हे शाखा यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज