mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 28, 2021
in सोलापूर
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रकही जाहीर केले होते.

येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॅंकेची निवडणूक होईल, अशीही दाट शक्‍यता होती. काल मात्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आदेश काढून सोलापूरसह,

नाशिक, नागपूर आणि बुलडाणा या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यावर 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक घ्या, असे म्हणणारा एक गट राष्ट्रवादीत आहे.

तर आत्ताच निवडणूक नको, निवडणूक झाली तरीही आपल्या हातात बॅंक येणार नाही, असा सांगणारा दुसरा गट होता. राष्ट्रवादीतील या दोन मतप्रवाहामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक काही काळासाठी पुढे गेली आहे.

सन 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर आता राष्ट्रवादीचे किती संचालक निवडून येऊ शकतात?, आणि ज्या संचालकांच्या काळात बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली, तेच संचालक पुन्हा येऊ शकतात, अशीही शक्‍यता निर्माण झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बॅंकेला मार्च 2021 अखेर 162 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे.

बॅंकेची शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी वसुली करूनच संचित तोटा कमी होणार असल्याने सद्यस्थितीत शेती कर्जाच्या वसुलीस अडचणी येत आहेत. संचित तोटा भरून काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

त्याबरोबरच सी.आर.ए.आर ची पूर्तता करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.बॅंकेच्या थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावशाली उपाययोजना करण्यासाठी आणि बॅंक आर्थिक स्थितीत येण्यासाठी बॅंकेवर नियुक्त केलेले प्रशासक आणखी काही कालावधीसाठी कार्यरत असणे आवश्‍यक असल्याचेही मत सहकार विभागाने नोंदविले आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार असल्याने अनेक नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सहकार विभागाने काल काढलेल्या आदेशामुळे किमान काही महिने तरी आता बॅंकेच्या निवडणुकीचा विषय आता थांबला आहे.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवडणूकसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक

संबंधित बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! मंगळवेढा जिल्हा परिषदचे 10 तर पंचायत समितीत 15 उमेदवारी अर्ज अवैध; माजी जिल्हा परिषद सदस्याचा एबी फॉर्म बाद

January 22, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने केले होते सपासप वार; जमिनीच्या हिश्श्यावरुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

January 22, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद गटासाठी १३ तर पंचायत समिती गणासाठी २९ उमेदवारी अर्ज दाखल; मंगळवेढ्यात आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस

January 21, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

भाजपच्या आजी-माजी आमदारांकडून ZP साठी स्वतंत्र मुलाखती; परिचारकांकडून गावभेट दौरा, तर आवताडेंनी इच्छुकांना बोलावले मंगळवेढ्यात

January 17, 2026
Next Post
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

ताज्या बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 12, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा