टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील कोंचीकोरवी गल्लीतील पोशम्मा मंदिरामागे असलेल्या दोन मजली इमारतीत मटका घेण्याचे काम चालत होते. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या इमारतीवर छापा मारला. यावेळी पोलिसांच्या भीतीने मटका घेणारा सर्फराज बब्बू इनामदार (वय 42, रा. साईनाथनगर, नई जिंदगीजवळ) हा इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
न्यू पाच्छा पेठ, कोंचीकोरवी गल्लीतील पोशम्मा मंदिरामागे असलेल्या दोन मजली इमारतीत मटका चालतो, अशी माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. त्यावेळी पोलिसांना पाहून सर्वजण पळून चालले होते.
मटका घेणारा सर्फराज बब्बू इनामदार याला पोलिसांनी पकडले. तेव्हा पोलिस आपल्याला खूप मारतील या भीतीने सर्फराज हा पोलिसांच्या हातातून निसटून दुसर्या मजल्यावर पळून गेला.
दुसर्या मजल्यावरून त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडून जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेचे वृत्त समजताच शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक संजय जगताप तसेच सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्या भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
Matkewala dies after jumping from second floor after attacking Matka Bookie
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज