टीम मंगळवेढा टाईम्स । पिंपरी – चिंचवड भागातील फ्लॅट विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुणे पोलिसांनी विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने अटक केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी – चिंचवड भागातील एका महिलेला त्यांनी फ्लॅट विक्री केला होता.
तोच फ्लॅट उपमहापौर राजेश काळे यांनी इतरांनाही विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले . याप्रकरणी पिंपरी – चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस ठाण्यात काळे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
६२ वर्षीय महिलेने ही तक्रार दाखल केली होती . सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद आहे . तर निगडी पोलीस ठाण्यात पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद असल्याची माहिती आहे.
निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजेश काळे हे फरार घोषित करण्यात आले आहेत . त्याही गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे . शुक्रवारी सकाळीच सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर काळे यांना अटक केली.
Solapur Deputy Mayor Kale arrested for fraud
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज