mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शहरात पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ शहरात पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.


 

एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना झाली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने वैद्यकिय यंत्रणा, शासन आणि प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु बार्शीतील पारधी समाजाने २१ व्या शतकात देखील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षीतपणा उघड झाला आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी शास्त्राच्या प्रगतीतून भारताला जगातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले होते.


 

परंतु आजही शेवटच्या घटकांपर्यंत ज्ञानगंगा न पोहोचल्याने, पारधी समाजासारखे अनेक समाज घटक हे सामाजिक प्रगतीपासून कोसो दूर राहिल्याचे वास्तव दिसून येत आहे. केवळ शिक्षणाच्या अभावामुळेच हे घटक त्यांच्या वििवध प्रकारच्या हक्कांसाठी वंचित राहिले आहेत. या अडाणीपणाचा फायदा उचलून काहीजण त्यांची पिळवणूकही करत आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत पारधी समाजाकडून होणाऱ्या कृतीला शिकलेला समाज अंधश्रध्दा म्हणेल, परंतु त्याच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकिय व प्रशासकिय यंत्रणेने चांगले दर्जेदार शिक्षण देवून शिक्षीत केल्यास तोच समाज स्वत:च्या पायावर उभारण्यासाठी, प्रतिष्ठा मिळण्यासाठीची धडपड करेल, त्यांना योग्य त्या मार्गाने समजावून सांगीतल्यास आपल्या चुका लक्षात येतील व आपण अंधश्रध्दा बाळगत होतो आणि तो चुकीचा मार्ग होता हे त्यांच्या लक्षात घेवून इतरांनाही साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतील. 

चांगला सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. असे झाल्यास यातूनच देशाचा महासत्तेकडे वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

देवाच्या दयेने आम्हाला सर्दि नाही ना खोकला नाही ना कसला त्रास नाही, इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली आहे. दर सणाला नैवेद्य, उद, कापूर, दिवे लावायचे आणि पाया पडायचे, देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही. कोराेनामुळे मयत झाल्यावर हात लावू देत नाही, पॅक करून देता, किडण्या काढून घेता की काय हे माहित पडत नाही.

– पाराबाई भगवान पवार

करूनाबाईने मला कोरोनामधून वाचविले,

– साहेल परशू काळे

करूनाबाईसाठी काेंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होतो.

– बाली सोमनाथ पवार

आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून करूनाबाईला इथे जागा दिली. देवाच्या क्रपेमुळे ताेंडाला कपडे लावायची गरज नाही.

– सोमनाथ परशूराम पवार

या जागेवरच करूणादेवीची स्थापन केली, आम्ही तिला मरेपर्यंत माननार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरू आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले.

– कमलाबाई रोहिदास पवार

आमच्या नातीला दिसली, तोंडाला कपडा बांधून ती आली होती. मला जागा द्या म्हणाली, देवळापाशी जागा दाखवते म्हणाली.

– चंपाबाई बाबू काळे

माणसाचे मन भावनिकतेने विचार करते, त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येते. कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शािररीक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगीतले आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. कोरोनाच्या नावाखाली कोणी अंधश्रध्दा पसरवत असेल तर वैज्ञानिक द्रष्टीकोनातून अशा प्रकारच्या अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, आरोग्यासाठी कोरोना रोगाचे मार्गदर्शन झाले पाहिजे.- विनायक माळी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य

Solapur Establishment of Corona Devi by the Pardhi community of Barshi

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये आज सात जणांचा मृत्यू; 411 कोरोनाबाधितांची भर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज सात जणांचा मृत्यू; 411 कोरोनाबाधितांची भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा