टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच चालली आहे रविवारी 102 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 588 व्यक्तींचे अहवाल रविवारी प्राप्त झाले होते.
तर विजयपूर रोडवरील कमला नगरातील 34 वर्षीय पुरुषाचा, आसरा परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा आणि व्ही.एम. मेडिकल सोसायटीतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णांची एकूण संख्या तीन हजार 804 झाली असून मृतांची संख्या 325 झाली आहे.
शहरातील ‘या’ परिसरात सापडले नवे रुग्ण
जम्मा वस्ती, हनुमान नगर, वर्धमान नगर, बाळे, गीता नगर, अंबिका नगर (नई जिदंगी), रेवणसिध्देश्वर नगर, मजरेवाडी, रेल्वे सोसायटी, स्वागत नगर, भूषण नगर, डफरीन चौक, आरटीओ ऑफिसजवळ, विजापूर नाका, गांधी नगर, वैष्णवी नगर (सैफूल), ईश्वर नगर (अक्कलकोट रोड),
मुरारजी पेठ, अरविंदधाम, कमला नगर, पश्चिम मंगळवार पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, भवानी पेठ, राहूल नगर, कुमठे, मोदीखाना, विडी घरकूल, एमआयडीसी, होटगी रोड, रेल्वे लाईन फॉरेस्ट, रेसिडेंट डॉक्टर क्वार्टर, थोबडे वस्ती (देगाव नाका), बुधवार पेठ, निलम नगर (एमआयडीसी), आदित्य नगर (विजयपूर रोड), टिळक नगर, रामवाडी, उत्तर सदर बझार, बेडर पुलाजवळ, विष्णू मिल चाळ, याठिकाणी रविवारी नवे रुग्ण सापडले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज