mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनात आरोग्याशी असा खेळ! ‘या’ गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात सापडल्या आळ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनात आरोग्याशी असा खेळ! ‘या’ गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात सापडल्या आळ्या




टीम मंगळवेढा टाइम्स । कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यादायी गोष्टींना अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. स्वच्छ जागा, स्वच्छ अन्न आणि शुद्धता ही सध्या महत्त्वाची तत्वे आहेत. पण आरोग्याच्या या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Arrive at the patient’s meal at Mohol’s Quarantine Center

मोहोळ शहरासह तालुक्यातील कोरोना रूग्णाची संख्या रोजच्या रोज वाढत आहे.मोहोळ प्रशासनाकडून रूग्ण व त्यांच्या सर्पकात आलेल्याना क्वारंटाईन करून सेंटरमध्ये ठेवत आहेत. क्वारंटाईन केलेल्याना जेवण प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. सेंटर मध्ये जेवण निकृष्ठ दर्जाचे देण्यात येत आहे. मंगळवार दि.28 जुलै 2020 रोजी दिलेल्या जेवणाध्ये आळ्या व खडे निघाले.


जेवणात आळ्या असल्याचे दिसून आल्यानंतर काही जणास उलट्या झाल्याचे सांगण्यात आले. क्वारंटाईन करण्यात आलेल्या च्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार मोहोळ येथील प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मोहोळच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रूग्णाच्या जेवणात आळ्या @SpSolapurRural @Info_Solapur @bharanemamaNCP pic.twitter.com/698Hy7PWME

— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 29, 2020

याबाबत अधिक माहितीअशी की,मोहोळ शहरातील रोहिदास नगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यानंतर मोहोळ येथील प्रशासनाने त्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना मोहोळ शहरातील गरड महाविद्यालयाच्या इमारती मध्ये क्वारंटाईन केले आहे. मात्र या ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना सकस व दर्जेदार अन्न दिले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.


मंगळवारी 28 जुलै रोजी या क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना दिलेल्या जेवणामध्ये आळ्या,खडे आढळले. हे जेवण खाल्ल्यानंतर येथील रुग्णांना मोठ्या प्रमाणात उलट्यांचा त्रास सुरू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे,नगरपरिषदेचे कर विभागांच्या प्रमुख हाके , व महसूल कर्मचारी यांनी तात्काळ क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.सेंटर मधील लोकांना सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ यांच्या नियंत्रणाखाली ठेकेदारामार्फत अन्नपुरवठा केला जातो.

मात्र त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल कार्यालयाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये दर्जेदार अन्न दिले जात असल्याचा प्रशासनाचा दावा या घटनेमुळे फोल ठरला असून प्रशासन याबाबत असंवेदनशील असल्याचे समोर आले आहे.आळ्याच्या प्रकारामुळे मोहोळ शहरासह तालुकावासीयांतून संताप व्यक्त केला जात असून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान 28 जुलै रोजी मोहोळ शहरात व तालुक्यात नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये मोहोळ शहरातील रोहिदास नगर 3 , साठे नगर 2 , पापरी 2 , कामती बु .7 रूग्ण मिळून आले आहेत.

क्वारंटाईन करण्यापूर्वी आम्ही प्रशासनाला होम क्वारंटाईन करण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासनाने आम्हाला गरड महाविद्यालयाच्या इमारतीत क्वारंटाईन केले. या ठिकाणी आमची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या ठिकाणचे अन्न खाल्ले तर कोरोनापूर्वी हे अन्न खाऊनच मरण्याची वेळ आमच्यावर येईल. – क्वारंटाईन इसम,मोहोळ


ठेकेदाराला नोटीस काढणार

गेल्या अनेक दिवसांपासून हे क्वारंटाईन सेंटर सुरू आहे. या पूर्वी अशी घटना घडली नाही. आज की घटना समोर आल्याने संबंधित ठेकेदाराला आम्ही कारणे दाखवा नोटीस काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत. – गणेश क्षीरसागर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात क्वारंटाईन सेंटरमधील महिलेचा मृत्यू! हलगर्जीपणा नडला,नातेवाईकांचा गोंधळ

सोलापुरात क्वारंटाईन सेंटरमधील महिलेचा मृत्यू! हलगर्जीपणा नडला,नातेवाईकांचा गोंधळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 4, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा