टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी
सकाळी ८ वाजेपासून ते ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री १० पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि ३७ (३) चे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत.
त्यानुसार ग्रामीण भागात सभा, मिरवणुका व पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे,
फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे,
ग्राम्य भाषा वापरणे, नीतीविरुध्द जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल,
सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस सभ्यता निरनिराळ्या अगर जाती तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज