सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 125 नवे कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक म्हणजे कोरोनामुक्त झाल्याने आज 192 जणांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान आज शहर व ग्रामीण भागात मिळून 153 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज 1 हजार 717 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 592 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 75 पुरुष तर 50 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजार 744 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 878 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोनामुक्त झाल्याने ग्रामीण भागातील 25 हजार 825 जणांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे तर अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये तीन हजार 41 जण उपचार घेत आहेत.
आज ‘या’ गावातील नऊ जणांचा मृत्यू
मंगळवेढा घाटोळ वस्ती दामाजी नगर येथील 70 वर्षाची महिला,तालुक्यातील बोराळे येथील 44 वर्षाचे पुरुष,पिलीव (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील 51 वर्षाची महिला, लिंकरोड पंढरपूर येथील 77 वर्षाचे पुरुष, चिचुंबे (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष,
तर सांगोला शहरातील शनी गल्ली येथील 50 वर्षाचे पुरुष, सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला तर गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 27 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुकानिहाय बाधितांची संख्या कंसात मृत्यू
मंगळवेढा- 1371 (35),सांगोला- 2371 (36), पंढरपूर- 5856 (162),दक्षिण सोलापूर- 1406 (44),मोहोळ- 1375 (75),अक्कलकोट- 1071 (67), बार्शी- 5352 (175), करमाळा- 2008 (46), माढा- 3053 (102), माळशिरस- 5162 (102), उत्तर सोलापूर- 719 (34) = एकूण- 29744 (878)
सोलापूर शहरात आज 28 जण पॉझिटिव्ह
सोलापूर शहरातील 331 संशयितांमध्ये 20 पुरुषांचा आणि 8 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सुरवसे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आयुक्त पी. शिवशंकर यांनी केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे ते शक्य होऊ लागल्याचे चित्र आहे.
मराठा वस्ती, टिळक चौक (उत्तर कसबा), देगाव नाका, नई जिंदगी, देगाव, कमलसिध्द अपार्टमेंट, आर्यनंदी नगर (वसंत विहार), बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), पाटील नगर (सैफूल), जुना विडी घरकूल, साहिल नगर, टिळक नगर (मजरेवाडी), पदमांजली अपार्टमेंट (मोदी खाना), गुरुनानक नगर, सलगर वस्ती, न्यू पाच्छा पेठ, गोकूळ नगर (जुळे सोलापूर) आणि मंत्री चंडक नगर (रूपाभवानी मंदिराजवळ) आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.
आतापर्यंत शहरातील पाच हजार 535 पुरुषांना तर तीन हजार 859 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 92 संशयित व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर अवघ्या 60 संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज