टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी 10 वाजता माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर येथून करण्यात येणार आहे.
आज सिद्धेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून माचणूर येथे प्रचार सभा घेण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विठ्ठल घुले, संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर, युवराज घुले,हणमंत मासाळ यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकरी सोसायटीचे सचिव,पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सिद्धेश्वर आवताडे बोलताना म्हणाले की, आज आम्ही माचणूर येथून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करणार असून यावेळी प्रचार सभा घेणार आहोत. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.
कोरोना नियमांचे पालन करून आम्ही प्रचार सभा घेत आहोत, तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिध्देश्वर आवताडे यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज