टीम मंगळवेढा टाईम्स ।
1 ऑक्टोबर 2021 जेष्ठ नागरिक दिनापर्यंत वयोवर्ष 60 च्या पुढील वृध्द व्यक्तींसाठी मंगळवेढा शहरात कोणत्याही हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मोफत रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी दिली.
बालपण देगा देवा! असे सगळेच म्हणतात. पण आयुष्याच्या शेवटी येणारे म्हतारपण हे सगळ्यांनाच नकोसे असते. कारण आयुष्यभर आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप करण्याची ही वेळ असते.
प्रायश्चित्य करावेसे वाटत असले तरी देखील करता येत नसते, कारण शरीर साथ देत नाही. कोणावरही अवलंबून न राहण्याची इच्छा असताना देखील त्यांना सतत लहान-सहान गोष्टींसाठी अनेकांची मदत घ्यावी लागते.
समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण, वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात.
वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक दुखणी देखील मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते.
परंतु कित्येक कुटुंबातील सदस्य नोकरीमुळे कामामुळे योग्य वेळी इच्छा असून देखील आपला वेळ देऊ शकत नाही.आशातच घरातील महिलांना आशा वॄध्दानां दवाखान्यात नेण्याची जबाबदारी पार पाडावी लागते आणि ही जबाबदारी पार पाडत आसताना त्यांना शारीरिक ताकदीच्या मर्यादा येतात तसेच प्रत्येकाकडे वाहन असेलच असे नाही.
यासाठीच येत्या 1 ऑक्टोबर 2021 जेष्ठ नागरिक दिनापर्यंत वयोवर्ष 60 च्या पुढील वृध्द व्यक्तींसाठी मंगळवेढा शहरात कोणत्याही हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मोफत रिक्षाची सुविधा उपलब्ध करणार आहे.
या साठी लवकरच 1 फोन नंबर जाहीर करण्यात येईल या फोन नंबर वरती फोन केल्यानंतर 15 ते 20 मिनीटात आपली ने – आणण्याची व्यवस्था केली जाईल. सुरूवातीला ही सुविधा फक्त मंगळवेढा शहरापुरतीच मर्यादित असेल असे सिध्देश्वर आवताडे म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज