टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध येत्या १५ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेतच सुरू राहतील.
दरम्यान आज शनिवार व उद्या रविवारीही दिवसभर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत.
औषधे, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्र या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच वगळले असून या सेवा नियमित सुरू ठेवता येणार आहेत.
नव्या आदेशानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत दहावी व बारावी वगळता सर्व शाळा, खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील, तर खेळ, सामने यात्रा, उत्सव, वारी यावरीलही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. होमडिलिव्हरी व वितरणासाठी मात्र रात्री दहापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता कोरोनापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज