
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी झाला असून दीनानाथ रुग्णालयात ५२ वर्षांचा पुरूषचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यास कोणापासून संसर्ग याची निश्चित माहिती अद्याप सरकारला मिळाली नाही.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या देशात १ हजार २२४ तर राज्यात २१५ वर पोहचली आहे.
केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई ७, पुण्यात – १ , बुलढाण्यात १ अशी मृतांची संख्या आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












