टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते आज सकाळी 10 वा.उद्घाटन होणार आहे.
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील डीजे कॉम्प्लेक्स येथे आजपासून शैला गोडसे यांचे सर्वसामान्य जनतेसाठी संपर्क कार्यालय सुरू होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर विभागाचे शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर,शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संजनाताई घाडी, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,सोलापूर युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे,पंढरपूर विभाग युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख,
मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहरप्रमुख महिला आघाडी सर्व पदाधिकारी उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष युवासेना महिलाआघाडी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार असून सर्वांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन शैला गोडसे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज