टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बाेराळे नाक्यावरील स्मशानभूमी मध्ये प्रेत जाळण्याचे काम करणाऱ्या व जिवंतपणी स्मशानात अठराविश्व दारिद्र्यात जगणारे तसेच टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करीत स्मशानभूमीतच स्थायिक झालेल्या जोगी कुटूंबियांना साडीचाेळी व भगवा फेटा बांधून संसार उपयाेगी साहीत्या किट वाटप शिवप्रेमी तरुण मंडळातर्फे करण्यात आले.
जाेगी कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य असताना मंगळवेढ्यातील जनतेच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगी अतिशय प्रामाणिकपणे स्मशानभूमी मध्ये सुविधा देणाऱ्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्मशानभुमीतील स्वच्छता व त्या ठिकाणी हे कुटूंब करीत असलेली सेवा, पवित्र्यामुळे प्रेताची अवहेलना होत नाही. यांचे सेवेमुळे नागरिक दुःखद प्रसंगी सुद्धा या कुटुंबाचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.
त्यामुळे या कुटुंबाच्या कार्याची दखल घेऊन मंगळवेढ्याची जनता याची चांगल्या रूपानं परतफेड नक्कीच करील यात शंका नाही असे नगरपालीकेचे कर्मचारी राम पवार म्हणाले.
यावेळी प्रा.संतोष आसबे यांनी आपले विचार व्यक्त करताना असे सांगितले की, ज्या ठिकाणी माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो, त्या ठिकाणी आपल्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे. हा समाज अत्यंत कमी व विखुरलेला आहे.
स्मशानात लोक जायला घाबरतात त्या ठिकाणी संसार उभा करून दुःखद प्रसंगात अत्यंत मायने सेवा करणाऱ्या कुटुंबाचं त्यांनी कौतुक केले.
विलास अवताडे गुरुजी यांनी यावेळी सदर कुटुंबाला मदतीची गरज असून त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या मदत कार्यात मंडळा बरोबर मी अग्रेसर असेल असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी राजू शेख वकील, अशोक जावळे, अशोक लेंडवे, प्रा.युवराज पवार,विठ्ठल फुगारे , सचिन डोरले, विलास अवताडे गुरुजी, संजय ढगे, अर्जुन डोरले, बाळासाहेब जावळे, दामाजी पवार, पंकज जाधव, बाबासो पवार, दत्तात्रय ढोणे, बसवेश्वर लंगोटे, सौरव गुंगे, निखिल गोपाळकर यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल फुगारे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज