टीम मंगळवेढा टाईम्स।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून खाोमनाळ जिल्हा परिषद शाळेत मंगळवेढ्याचे गटशिक्षण अधिकारी पाेपट लवटे यांच्या हस्ते सायकल बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्धाटन सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रेरणेतून साकारलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत खोमनाळ शाळेतील गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशालीताई बिले होत्या. सायकल बँकेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशालीताई बिले यांनी एक सायकल भेट दिली.
शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य एक सायकल व शाळेतील शिक्षक वर्ग यांनी एक सायकल ,या उपक्रमास भेट दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र भोरकडे यांनी एक सायकल तर उपसरपंच दत्तात्रय बिले व प्रभू इंगळे यानी एक सायकल देण्याचे आश्वासन दिले.
सायकल बँकेसाठी गटशिक्षणअधिकारी लवटे यांनी यावेळी रूपये १००० ची देणगी दिली. या कार्यक्रमासाठी सरपंच उत्तमराव लंगडे, व्यस्थापन समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र भोरकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मनीषा ढेंबरे, बाळकृष्ण इंगळे, प्रमोद इंगळे, बिरुदेव मोटे,
अश्विनी सोनवणे, जगन्नाथ खांडेकर गुरुजी, सचिन शिंदे, संग्राम हजारे, राजाराम शेळके हे उपस्थित होते . तसेच या कार्यक्रमासाठी बायडाबाई मदने, स्वाती बिले, पुष्पाताई हजारे आदी उपस्थित होते .
या उपक्रमासाठी शिक्षण तज्ञ जगन्नाथ खांडेकर गुरुजी यांनी एक हजार रुपये देणगी दिली.
या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी बी .डी . पांढरे , केंद्रप्रमुख भीमाशंकर जतकर , प्र. केंद्रप्रमुख प्रकाश साळुंके यांनी शुभेच्छा दिल्या . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुक्तार पटेल, भारत बिले, कांताराम बाबर, धर्मराज जाधव, अनिता चिकमणे, मंजुषा भालेराव ,उद्धव इंगळे, या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज