टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने भव्य मधुमेह तपासणी व उपचार पंधरवडा तर अस्थिरोग पेशंटची मोफत तपासणी केली जाणार असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
दि.7 नोव्हेंबर पासून ते दि.21 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मधुमेह तपासणी व उपचार भव्य सवलतीत करण्यात येणार आहे.
डॉ.अमोल चव्हाण हे एमबीबीएस, डीएनबी मेडिसिन असून रुग्णांना रक्ताच्या तपासणीवर 5 टक्के सूट व मेडिकल दुकानांमध्ये मधुमेहाच्या औषधावर 5 टक्के सूट दिली जाणार आहे.
तर सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ.अभिजीत साळुंखे हे दि.31 डिसेंबर पर्यंत मोफत ओपीडी मध्ये रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.
दि.31 डिसेंबर पर्यंत रुग्णांना फिजिओथेरपी वर 25 टक्के सूट, एक्स-रे वर 25 टक्के सूट, मेडिकल दुकानांमध्ये 5 टक्के सूट, रक्ताच्या तपासणीवर 5 टक्के सूट दिली जाणार असल्याचे हॉस्पिटलने जाहीर केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज