मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथे मेंढ्या चालण्यासाठी आलेल्या वासुदेव गोरडे या मेंढपाळाची काल रात्री 11 च्या सुमारास विषबाधेमुळे 80 मेंढ्या बाधित झाल्या असून 22 मेंढ्या मृत पावल्या आहेत. कष्टाने सांभाळलेल्या मेंढ्या अचानक मृत पावल्याने या मेंढपाळाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तेथील मेंढपाळ मेंढ्या चालण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत असतात.
सांगली जिल्ह्यातील कुची येथील वासुदेव गोरडे हे आपल्या 200 मेंढ्या जगवण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी परिसरात मुक्कामी आहेत. काल दि.18 रोजी दिवसभर त्यांनी मेंढ्या परिसरातील डाळिंब शेवग्याच्या बागेत चारल्या व सायंकाळी आपल्या मुक्कामी आणले असता
रात्री 11 च्या सुमारास 22 मेंढ्या मृत अवस्थेत पडल्या तर 56 मेंढ्या बाधित झाल्या होत्या त्यानी पहाटे बघितल्यानंतर मेंढ्या मृत पावल्याचे लक्षात येताच त्यांनी धावपळ सुरू केली. अचानकपणे झालेल्या या नुकसानीमुळे गोरडे कुटुंबीय आर्थिक खाईत सापडले आहे.
मृत मेंढ्यांची माहिती प्रशासनाला कळविल्या नंतर प्रशासनाने याची तातडीने दखल घेत डॉ.सुहास सलगर डॉ तानाजी भोसले, डॉ.देशमुख, डॉ.सत्यवान यादव डॉ. गणेश जतकर, डॉ.सचिन पाटील यांच्या पथकाने तातडीने उपचार करत 56 विष बाधित झालेल्या मेंढ्या वर उपचार केले
तर येथील 22 मेंढ्या मृत झाले आहेत उपचार केलेल्या मेंढ्या व्यवस्थित आहेत. काल एका डाळिंब बागेत मेंढपाळ आणि मेंढ्या कारल्याची माहिती असून या बागेवर औषध फवारल्याचे समजते या औषधामुळे विषबाधा झाल्याची माहिती आहे.
संबंधित मेंढपाळाचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले असून त्याला आर्थिक भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान कालपासून पावसाची संततधार असून जनावरांच्या चाऱ्याचे हाल होत असताना डाळिंब बागेत मेंढ्या चा नेल्याचे समजते.
चालू पावसातच पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधा झालेल्या मेंढ्या उपचार करत मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज