सलगर खुर्द | सचिन खुळे
सलगर खुर्द दि. १६ जुलै २०२३
स्पर्धेच्या युगात अंगमेहनत आणि चिकाटीने अभ्यास करावा व विदयार्थ्यांनी यश खेचून आणावे. असा मौलीक संदेश सिंधुदुर्गचे गट शिक्षणाधिकारी प्रा.संजय माने यांनी दिला
सलगर खुर्द येथे मायभूमी सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी प्रमुख म्हणून पाहुणे ते बोलत होते.
सलगर खुर्द येथील वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांनी एकत्रित येत १ जानेवारी २०१५ रोजी ‘मायभूमी सामाजिक विकास प्रतिष्ठान’ या मंडळाची स्थापना केली होती.
त्याचा उद्देश गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत करणे हा आहे, त्यातुनच आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये इयत्ता १० वी१२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच इयत्ता १ ते १० वी वर्गातील ९८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्वप्नलता बिराजदार ,सुप्रिया चौंडे, काजल पाटील, कोमल पाटील, सुदर्शन कांबळे, संभाजी भुसनर आणि विठ्ठल भूसनर आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच आरतीताई कांबळे यांनी मंडळाचा हा कार्यक्रम एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पाटील सर यांनी केले. सुंदर कार्यक्रमासाठी मंडळाचे मार्गदर्शक सेवा- निवृत्त शिक्षक शामराव बनसोडे,सैनिक नीलकंठ माने, माजी उपसरपंच दत्तात्रय धायगोंडे सुनील कांबळे, अजय कांबळे सर, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने ‘उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब भोरकडे सर यांनी तर रंगनाथ राऊत सर यांनी आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज