mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 22, 2025
in क्राईम, राष्ट्रीय
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

शेरॉन राज हत्या प्रकरण केरळच्या अलीकडील इतिहासातील सर्वांत धक्कादायक आणि उच्च-प्रोफाइल खटल्यांपैकी एक होते. या प्रकरणात केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा एसएसला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

२४ वर्षीय महिलेला तिचा २३ वर्षीय प्रियकर शेरॉन राज याची त्याच्या आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्णय दिला की, तिच्या गुन्ह्याची तीव्रता जास्त आहे.

त्यामुळे ग्रीष्मा केरळच्या इतिहासात फाशीची शिक्षा भोगणारी सर्वांत तरुण महिला ठरली आहे. पण ग्रीष्मा एसएस कोण आहे? तिने असे घृणास्पद कृत्य कोणत्या कारणामुळे केले? न्यायालयाने काय निर्णय दिला? त्याविषयी जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

ही घटना १४ ऑक्टोबर २०२२ ची आहे, जेव्हा शेरॉन त्याची प्रेयसी ग्रीष्मा हिला तिच्या घरी भेटायला गेला होता. फिर्यादीनुसार, कन्याकुमारीची रहिवासी असलेली ग्रीष्मा आणि तिरुवनंतपुरममधील परसाला येथील रहिवासी असलेला शेरॉन यांचे २०२१ पासून प्रेमसंबंध होते. त्यावेळी ती इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेत होती; तर शेरॉन बी.एस्सी. रेडिओलॉजीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.

मार्च २०२२ मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबाने तिचे लग्न तमिळनाडूमधील लष्करी अधिकाऱ्याशी ठरवले; मात्र तिने शेरॉनबरोबरचे नाते सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी ग्रीष्माची चिंता वाढत गेली की, शेरॉन त्यांचे नाते तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगेल. परिणामांच्या भीतीने तिने तिचे काका निर्मलकुमारन नायर यांच्याबरोबर शेरॉनची हत्या करण्याचा कट रचला.

शेरॉनला मारण्याचे अनेक प्रयत्न

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, ग्रीष्माने कथितरीत्या वेदनाशामक औषधांच्या परिणामांबाबत ऑनलाइन संशोधन केले आणि शेरॉनला विष देण्याचे अनेक प्रयत्न केले. तपासकर्त्यांनी उघड केले की, तिने त्याच्या पाण्यात आणि फळांच्या ज्यूसमध्ये अनेकदा विषारी औषध मिसळले;

परंतु हे प्रयत्न इच्छित परिणाम मिळविण्यात अयशस्वी ठरले. यशस्वी होण्याच्या निर्धाराने ग्रीष्माने अनेक प्रयत्न केले; मात्र तरीही शेरॉन वाचत आला. अयशस्वी प्रयत्नांमुळे निराश झालेल्या ग्रीष्माने तीव्र पदार्थ वापरण्याचा निर्णय घेतला.

१४ ऑक्टोबर २०२२ रोजी तिच्या नियोजित लग्नाच्या सुमारे एक महिना आधी ग्रीष्माने शेरॉनला तिच्या घरी बोलावले आणि त्याला एक औषधी आयुर्वेदिक पेय दिले. तिने दिलेल्या मिश्रणात विष मिसळल्याची माहिती शेरॉनला नव्हती.

आयुर्वेदिक पेये नैसर्गिकरीत्या कडू असल्याने, शेरॉनला त्यात काही असामान्य घटक आहे हे लक्षात आले नाही. परंतु, ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर लगेचच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्या रात्री त्याला तीव्र उलट्या झाल्या. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती अधिकच बिघडली.

तिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना ११ दिवसांनंतर शेरॉनचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपूर्वी शेरॉनने एका मित्राला सांगितले की, ग्रीष्माने त्याची फसवणूक केली आहे आणि तिने त्याला विष दिल्याचा संशय आहे. त्याच्या मृत्यूनंतर शेरॉनच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी ग्रीष्माला अटक करण्यात आली.

तिच्या आई आणि काकांनाही गुन्ह्याला प्रोत्साहन आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. कलम ३६४ (हत्येच्या उद्देशाने अपहरण), कलम ३२८ (विष देऊन दुखापत करणे), कलम ३०२ (हत्या), कलम २०१ (पुरावा मिटवणे), कलम २०३ (खोटी माहिती देणे) व कलम ३४ (गुन्हेगारी कृत्ये) यांसह अनेक कलमांखाली तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिला जवळपास वर्षभरानंतर म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये जामीन मिळाला होता.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

नेयट्टिनकारा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ग्रीष्माला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि तिचे वय लक्षात घेता, तिच्या गुन्ह्याची तीव्रता जास्त असल्याचे न्यायालयाने म्हटले. खटल्यादरम्यान बचाव पक्षाने दया दाखविण्याची मागणी केली होती आणि असा युक्तिवाद केला होता की, ग्रीष्मा एक उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड असलेली तरुणी आहे आणि ती सुधारणेच्या संधीस पात्र आहे. त्यांनी दावा केला की, तिने आधीच बदलाची चिन्हे दर्शविली आहेत. परंतु, ग्रीष्माने भावनिक फसवणूक करीत, शेरॉनचा विश्वासघात केला असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

“लैंगिक जवळीकीच्या बहाण्याने शेरॉनला बोलावून घेणे आणि त्यानंतर गुन्हा करणे या कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुन्हेगारी कृत्यांसाठी शिक्षा सुनिश्चित करणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

“ग्रीष्माने त्याला रेकॉर्ड न करण्यास सांगूनही शेरॉनने संशयास्पद ज्यूसचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यासारखे पुरावे हे सूचित करतात की, त्याला काहीतरी चुकीचे असल्याचा संशय होता. शेरॉनने पाण्याचा एक थेंबही न घेता, ११ दिवस आपल्या आयुष्यासाठी लढा दिला,” असे न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले.

त्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी शेरॉनने मानसिक दबाव आणि शारीरिक शोषण केल्याचा ग्रीष्माचा दावा फेटाळून लावला. “तिच्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाही. याउलट शेरॉनने कधीही तिच्यावर आरोप केले नाहीत. शेरॉन तिच्याशी कायम एकनिष्ठ राहिला; तर ग्रीष्माने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क कायम ठेवला,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ उदाहरण मानले आणि तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. तिचे काका निर्मल कुमार याला साथीदार म्हणून मदत केल्याबद्दल आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तिच्या आईची मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेल्या खटल्यात अंतिम निकाल देण्यापूर्वी ९५ हून अधिक साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: केरळ न्युज

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 16, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले?; पराभवाची 15 कारणे

November 15, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळजनक! ग्रामसेवकाच्या सहीचे बोगस कागदपत्र बनवून बँकेची ५३ लाखांची फसवणूक; बँक व्यवस्थापकासह २० जणांवर गुन्हा दाखल

November 14, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ

November 14, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
Next Post
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

पंढरपुरात आज आक्रोश मोर्चा, जरांगे-पाटील, धस येणार; जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन

ताज्या बातम्या

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 17, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा