टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाई प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत.
काही ग्रामस्थांनी तर पाणी अमेझॉन वाले विकत देतील का? अशी विनंती अमेझॉनला केलेली असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
भोसे 39 गाव पाणी पुरवठा योजनेतून या गावांना पाणी मिळत आहे. मात्र या योजनेचे लाईट बिल थकीत असल्यामुळे ही योजना बंद आहे. त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा होत नाही.
पाटखळ गावात ग्रामपंचायतीची विहीर असून त्या विहिरीतून नागरिकांना पाणी मिळत होते, आता त्या विहिरीने तळ गाठला असून गेल्या काही दिवसापासून नागरिकांना पाणी मिळायचे बंद झाले आहे.
ऐन पावसाळ्यात या गावांना पाणी मिळत नाही, प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करणेबाबत सरपंचांनी दिले होते पत्र
पाटखळ गाव हे दुष्काळी पट्टा असलेले गाव आहे. या ठिकाणी दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, तरी शासनामार्फत या पूर्वी सुरू करण्यात आलेली भोसे प्रादेशिक योजना अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात आला होता,
परंतु पाणीपुरवठा बंद झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे तरी, भोसे प्रादेशिक योजना पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा ही विनंती पंचायत राज समितीकडे केल्या असल्याची माहिती ऋतुराज बिले यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज