मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या एका घटनेत नऊ वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित आरोपीने शाळेच्या मधल्या सुटीदरम्यान सहा वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या घरात नेले. त्या मुलीवर अत्याचार केले. शेजारी राहणाऱ्या नातेवाइकाच्या मुलीने पीडित मुलीच्या आजीला याबाबत सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. याप्रकरणात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत नऊ वर्षांच्या मुलासोबत 16 वर्षांच्या मुलाने अनैसर्गिक कृत्य केले. घराजवळ चालू असलेल्या बांधकाम खोलीत हा प्रकार घडला. या प्रकरणात संशयित मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज