टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतजमिनीचा वाद, पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच व्यक्तीसोबत राहणारी भावजयी आणि तिने वडिलोपार्जित दोन एकर जमीन विकल्याचा राग, यातूनच
गुंजेगाव (ता. मंगळवेढा) येथील सात जणांनी मिळून एका महिलेचा व तिच्या ओळखीच्या पुरुषाचा हातोडा, कोयता व लोखंडी पाइपने मारहाण करून खून केला.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले असून दोघे रुग्णालयात दाखल आहेत. तर दोघे संशयित आरोपी फरार आहेत. रिना ढोबळे (वय ४०) व चंद्रकांत पाटील (वय.४५) अशी मयतांची नावे आहेत.
गुंजेगाव येथील ढोबळे वस्तीवर रिना ढोबळे रहायला आहेत, त्याठिकाणी त्यांची शेतजमीन आहे. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या शेजारी दीर लक्ष्मण ढोबळे यांचीही जमीन आहे.
शेतीच्या कारणावरून ९ मार्च रोजी त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यावरून रिना ढोबळे व लक्ष्मण ढोबळे यांनी परस्परविरोधी फिर्याद मंगळवेढा पोलिसांत दिली होती. तरीपण, त्यांच्यातील वाद मिटला नाही. लक्ष्मण यांच्या मनात रिनाबद्दल राग होताच.
मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास लक्ष्मण ढोबळे आणि त्याच्या मुलांनी व भाच्यांनी रिना ढोबळे यांच्या घरी चंद्रकांत पाटील (रा. राजापूर, ता. सांगोला) या व्यक्तीला पाहिले. त्या रागातून लक्ष्मण ढोबळेसह सात जणांनी त्या दोघांनाही बेदम मारहाण सुरू केली.
त्यात दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हेही त्याठिकाणी दाखल झाले.
मंगळवेढा पोलिसांनी दोघांचा खून करणाऱ्या सात संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले असून जखमी दोघांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. उर्वरित दोघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक बोरीगिड्डे यांनी सांगितले.
डोक्यात भरपूर घाव, चेहऱ्यावरही कोयत्याचे वार
मंगळवारी सकाळी रिना ढोबळे व चंद्रकांत पाटील या दोघांना एकत्रित पाहिल्यावर सात जणांनी मिळून लोखंडी पाइप, कोयता, काठी, हातोड्याने मारहाण केली. त्यांनी अन्यत्र जास्त न मारता डोक्यावर हातोड्याने सर्वाधिक घाव घातले आहेत.
याशिवाय दोन्ही मयताच्या चेहऱ्यावर कोयत्याचे वार आहेत. तर मयत चंद्रकांत पाटील याच्या हातावरही कोयत्याचे दोन वार आहेत. मारहाण करताना हात आडवा केल्यावर त्याला ते वार लागले होते. दोघांच्याही डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज