टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणींचा जागेवर निपटारा करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आ.समाधान आवताडे यांनी गावभेट दौरा सुरू केला आहे.
गुरुवारी एप्रिल रोजी देगाव, शरदनगर , ढवळस , धर्मगाव गावांना तर काल शुक्रवारी मुंढेवाडी , रहाटेवाडी , बोराळे , नंदुर , अरळी , सिद्धापूर , तांडोर , तामदर्डी , माचणूर , ब्रम्हपूरी बठाण , उचेठाण गावच्या नागरिकांना भेटी दिल्या व अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले, गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही गावात कार्यालये नाहीत, त्या गावातील नवीन कार्यालयांचे प्रस्ताव तात्काळ तयार करून मागणी करावी.
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय हे एकत्रित इमारतीत असावे असा प्रस्ताव द्यावा, गावात सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे मला कमी कालावधी मिळाला असला तरी जास्त काम करण्याचा माझा प्रयत्न आहे.
यावेळी आवताडे यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन समोरासमोर अधिकाऱ्यांना सूचना देऊन निपटारा करण्याचे आदेश दिले.
सदर गावभेटी दौऱ्याप्रसंगी माजी जि प. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , सभापती प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, कृउबा समिती सभापती सोमनाथ आवताडे , दामाजी शुगर व्हा . चेअरमन अंबादास कुलकर्णी,
संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, सुरेश भाकरे , सचिन शिवशरण, राजन पाटील , पप्पू काकेकर, विजय माने , नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे , गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण,
दिगंबर यादव, युवराज शिंदे, विनोदराज लटके तसेच आरोग्य, कृषी, महावितरण कंपनी, पोलीस, तहसील कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज