मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
माझेवर सतत खोटया केसेस करणाऱ्या स्वयंघोषित सिंघम अधिकाऱ्याविरुद्ध उच्च न्यायालयात मी याचिका दाखल केल्यामुळेच त्या अधिकाऱ्याचा तिळपापड झाला असून
वैयक्तीक द्वेषातून तो अधिकारी बिनबुडाची विधाने करीत असल्याचा खुलासा अखिल भारतीय मराठा महासंघाचे मंगळवेढा शहराध्यक्ष आण्णासाहेब आसबे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.
आसबे म्हणाले, सदर अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरूद्ध कोल्हापूर येथे विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्या अधिकाऱ्याला कावीळ झाली असल्याने आता जग पिवळे दिसत असून या आंदोलनाचा खर्च मी करीत असल्याचा साक्षात्कार त्याला झाल्याने
तो तोंडाला येईल ते बोलू लागला आहे. अनेक गुन्हे घडले परंतू त्यापैकी बहुतांशी गुन्ह्याची उकल न करता एखादा गुन्हा उजेडात आणून प्रसिद्धीचा खटाटोप सुरू असतो.
अधिकाऱ्याच्या हस्तक असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाळू चोरी करणारे वाहन आवारात आणून लावले होते ते सोडण्यासाठी ५० हजार रूपयाची मांडवाली झाली याचे सर्व फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे.
सदर प्रकरणानंतर एका कर्मचाऱ्यास निलंबीतही करण्यात आले होते मात्र मास्टरमाईंड अद्यापही मोकाट आहे.
याचा राग मनात धरून माझ्याविरूद्ध अॅट्रासिटी, विनयभंग सारख्या खोट्या केसेस दाखल करून मला विनाकारण त्रास देण्यात आला. आजही तो त्रास सुरूच आहे.
एखादे प्रकरण अंगलट येईल हे लक्षात आल्यानंतर तो अधिकारी राजकारण्यांकडे लोटांगणे घालून प्रकरण मिटवण्याची विनंती करतो यातच त्याची चुक आहे
हे लक्षात येत असून याप्रकरणी वरिष्ठांनी त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा प्रकरण चिघळून काही घटना घडल्यास त्यास त्या अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात यावे असा इशारा आण्णा आसबे यांनी त्या प्रसिद्धी पत्रात दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज