मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी गेलेल्या सोलापूरच्या 8 ‘एसआरपीएफ’ जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्या आठही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या 26 एप्रिल रोजी सोलापुरातून 90 जणांची तुकडी मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेली होती. त्यातील 50 जण ‘मातोश्री’ वर बंदोबस्तासाठी होते. 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे उर्वरित जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, 26 एप्रिलपूर्वी गेलेली पहिली 90 जणांची तुकडी सोलापुरात पोहोचली होती. त्या 90 ‘एसआरपीएफ’ जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती ‘एसआरपीएफ’चे अधीक्षक रामचंद्र केंडे यांनी बोलताना दिली.
मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी सोलापूरचे ‘एसआरपीएफ’चे जवान असतात. ‘मातोश्री’वर बंदोबस्तासाठी गेलेली पहिली तुकडी परतल्यानंतर त्यांच्या जागी दुसरी 90 जणांची तुकडी 26 एप्रिल रोजी पाठविण्यात आली होती. त्या 90 जणांपैकी 50 जवान ‘मातोश्री’वर बंदोबस्तासाठी होते, तर इतर 40 जण मुंबईत इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी होते.
‘मातोश्री’ वर बंदोबस्तासाठी असलेल्या सोलापूरच्या 50 ‘एसआरपीएफ’ जवानांची तेथे तपासणी करण्यात आली. त्यात 8 जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. ते 8 जण पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे उर्वरित 42 जणांची तपासणी सुरू आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. (पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज