टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (M.P.S.C.) पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याचं पुढील सुधारित वेळापत्रक लवकरच शेअर केले जाईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जे.ई.ई. आणि निट परीक्षा कोरोना काळात घेऊ नये हीच आमची भूमिका होती. यातून मुलांना त्रास नको यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर या संकटात केंद्र सरकारनं समजून घेतले पाहिजं. परिक्षा पुढे घ्यायला हवी असंही त्या म्हणाल्या.
राज्यातील शाळा ऑगस्टपर्यंत सुरू करू शकत नाही हे आधी स्पष्ट केलं होतं. पण जर केंद्र सरकारच्या गाईडलाईन आल्या तर शाळा सुरू केल्या जातील अशी महत्त्वाची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, पहिल्यांदा इयत्ता दहावीची शाळा सुरू करावी आणि नंतर बाकी वर्ग सुरू करावे असा विचार आहे. पण केद्र सरकारने गाईड लाईन स्पष्ट कराव्यात. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. खरंतर, ऑक्टोबर महिन्यात नापास विद्यार्थ्यांची 10 आणि 12वीची परिक्षा घेतली जाते. पण या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अशात ऑक्टोबर महिन्यात परिक्षा घ्यायच्या का नाही ? याचाही विचार करावा लागणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे यासाठी ऑनलाईल परीक्षा घेता येणार नाहीत. त्याला पर्याय म्हणून विविध काय उपलब्ध करून देता येईल का याची चाचपणी सरकार करत आहे. पुढील याबाबत अधिक धोरण स्पष्ट केलं जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
So schools will start in the state,
Education Minister Varsha Gaikwad gave important information
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज