टीम मंगळवेढा टाइम्स ।
सरकारी काम आणि चार महिने थांब याचा प्रत्यय प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पाहण्यास मिळतो.असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहण्यास मिळाला.
विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत एका सरपंचाने 2 लाख रुपये समितीच्या कार्यालयासमोर उधळले.
गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून
थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि पैशांची उधळण केली. मंगेश साबळे असं या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत.
गावात विहिरी मंजूर करत नाही यासाठी लाच मागितली म्हणून या सरपंचाने शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले आणि पंचायत समिती कार्यालयात पैसे उधळले.
यावेळी या सरपंचाने राज्य शासनावर टीका करत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी या ठिकाणी अधिकारी पैसे मागत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी; संतप्त सरपंचाने गटविकास अधिकारी कार्यालयाबाहेर केली २ लाखांच्या नोटांची उधळण. #ChhatrapatiSambhajinagar #farmer pic.twitter.com/vXaujTTW8c
— Lokmat (@lokmat) March 31, 2023
शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, असे म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचाने गळ्यातील बंडलातील नोटांची उधळणही केली.
दरम्यान, शेतात विहीर बांधण्याचा प्रस्ताव कालच पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. तसंच आम्ही कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही.
उलट त्या सरपंचांनीच पंचायत समितीच्या आवारात येऊन फेसबुक लाईव्हद्वारे नोटा उधळत आमची बदनामी केली याची तक्रार आम्ही फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली आहे, यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवड देवी यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज