mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावांची सरपंच निवडीचा कार्यक्रमच लांबणीवर?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 7, 2021
in सोलापूर
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, अक्‍कलकोट यासह अन्य काही तालुक्‍यांमधील 15 गावांचा सरपंच आरक्षणात घोळ झाल्याबद्दल त्या गावांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यावर आता मंगळवारी सुनावणी होणार असून 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

एका गावाचे आरक्षण बदलल्यास रोटेशननुसार पुढील काही गावांचे आरक्षण बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरपंच निवडीचा संपूर्ण कार्यक्रमच पुढे ढकलला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 28 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 27 जानेवारीला आरक्षण सोडत झाली.

माढा, करमाळा, बार्शी या तालुक्‍यात नजरचुकीने व अनावधानाने सरपंच आरक्षणात काही चुका झाल्या आहेत. त्यात दुरुस्ती करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच ग्रामविकास विभागाकडे पाठविला असून संबंधित तालुक्‍यातील तहसिलदारांनी तशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या व बिनविरोध झालेल्या 654 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड 18 फेब्रुवारीपूर्वी करावी लागणार आहे.

मात्र, आरक्षण दुरुस्तीचा पेच समोर असतानाच आता न्यायालयात धाव घेतलेल्या गावांचाही प्रश्‍न समोर आला आहे. त्यामुळे सरपंच निवडीचा जाहीर केलेला कार्यक्रम (9, 11 आणि 13 फेब्रुवारी) पुढे ढकलला जाण्याची दाट शक्‍यता आहे.

सांगोल्यातील हक्‍करमंगेवाडी, मानेवाडी, मोहोळ तालुक्‍यातील अंकोली, पंढरपूर तालुक्‍यातील शेगाव दु. आणि माळशिरस तालुक्‍यातील एक गाव तर अक्‍कलकोट तालुक्‍यातील कर्जाळ या गावांसह अन्य नऊ गावांनी न्यायालयात धाव घेतल्याचे महसूल प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी बोलताना सांगितले. (source : सकाळ)

सरंपच आरक्षणावरुन उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित गावांबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील कोणकोणती गावे न्यायालयात गेली आहेत, त्या गावांचा शोध प्रशासनाकडून सुरु आहे.

दरम्यान, एका गावाचे आरक्षण बदलताना रोटेशेन पध्दतीने काही गावांचे आरक्षण बदलू शकते. त्यामुळे ठरलेल्या कार्यक्रमानुसार सरपंच निवडीवेळी न्यायालयात गेलेल्या गावांना वगळून अन्य गावांच्या सरपंचांची निवडी करता येतील का,

न्यायालयात गेलेल्या गावांचे आरक्षण बदलताना अन्य गावांच्या आरक्षणावर काही परिणाम होईल का, याबद्दल आता कायदेशीर तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतर सोमवारी (ता. 8) अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय

कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय
उच्च न्यायालयात गेलेल्या गावांच्या सरपंच निवडीचाच सध्या पेच असून त्यावर आदेशानुसार सुनावणीअंती निर्णय घेतला जाईल.परंतु, या गावांशिवाय अन्य गावांच्या सरपंच निवडीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.– मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतसरपंच निवडसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 17, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
Next Post
शेतकऱ्यांना दिवाळी गोड जाणार! अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई थेट खात्यात पैसे जमा होणार

मुख्यमंत्र्यांविरुद्ध व्यक्तव्य करणे भाजप नेत्याला भाेवले, पंढरपुरात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा उद्या मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा उद्या मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 17, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..